बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील अडीच वर्षांच्या क्षितिज विशाल बाजड याने 'गुगल बॉय' ही पदवी सार्थ ठरवली आहे. त्याने अवघ्या २ मिनिटे ३० सेकंदात ७१ देशांच्या राजधान्या सांगून 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये आपले नाव कोरले आहे. त्याच्या विलक्षण बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीने त्याने जिल्ह्याची मान उंचावली आहे.