बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सावरगाव परिसरात पहिलाच आणि ढगफुटीसदृश्य पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. जळगाव जामोद तालुक्यातल्या सावरगाव , येणगाव, माडखेड, उटी परिसरात काल सायंकाळी झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, नुकतीच पेरलेली कपाशी, सोयाबीन आणि इतर पिके वाहून गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.