येत्या 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार असून सिंदखेडराजा येथील जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून संपूर्ण परिसर उत्सवमय झाला आहे. जिजाऊ सृष्टीचा संपूर्ण परिसर आकर्षक सजावटीने सजवण्यात आला आहे. या ठिकाणी भव्य सभा मंडप उभारण्यात आला असून हजारो नागरिक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.