बुलढाणा जिल्ह्यातील खंडाळा देवी येथे दरवर्षी चैत्र पौर्णिमेनंतर जगदंबा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात भरते. या यात्रेदरम्यान गावातून देवीच्या सोंगाची मिरवणूक काढण्याची तब्बल 150 वर्षांची परंपरा आजही जपली जात आहे. विशेष म्हणजे या मिरवणुकीत देवीचे सोंग घेतलेली व्यक्ती गावातील लहान मुलांच्या अंगावरून पाय ठेवत त्यांना ओलांडत पुढे जाते, अशी अनोखी धार्मिक परंपरा येथे पाहायला मिळते.