बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात प्राण्यांसाठी अन्नसाखळीचे पोषक वातावरण असल्याने या अभयारण्यात विविध जाती प्रजातीचे हिंस्र प्राणी वास्तव्यात आहेत. ज्यामध्ये बिबट, अस्वल, आणि वाघ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे वन पर्यटन आणि बुलढाणा खामगाव मार्गावर अभयारण्यातून प्रवास करणाऱ्यां अनेक प्रवाश्यांना विविध प्राण्यांचे दर्शन होत असते. बोथा घाटातून प्रवास करत असताना रस्त्याच्या बाजूलाच शिकारीच्या शोधत फिरणाऱ्या एका बिबट्याचे दर्शन झाले, या प्रवाशाने बिबट्याला आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केलं आहे.