बुलढाणा जिल्ह्याच्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आपल्या मका पिकाची विक्री केली होती, याला दोन महिने उलटून देखील अद्यापही शासनाकडून शेतमालाचे पैसे मिळालेले नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील जवळपास दोन कोटी 64 लाख रुपये अजूनही देणे बाकी आहेत, तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 60 हजार क्विंटल मक्याचे 14 कोटी 40 लाख रुपये शासनाकडे बाकी आहेत.