बुलढाणा नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर स्ट्राँग रूममध्ये EVM मशीन ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असून उमेदवार आणि त्याचे प्रतिनिधी सुद्धा पहारा देत आहेत. सध्या जिल्ह्यात कडाक्याची थंडी असून उमेदवार त्याचे प्रतिनिधी मात्र पहारा देताना दिसत आहेत. तेथेच जेवण करतात आणि तेथेच झोपत असल्याचे पाहायला मिळतंय.