नांदुरा तालुक्यात रविवारी सकाळी झालेल्या वादळी पावसामुळे चांदूर बिस्वा ते जिगाव मार्गावरील दोन मोठी झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, झाडे रस्त्यावर आडवी पडल्याने नांदुरावरून जिगावकडे जाणारी एसटी बसही मार्गात अडकून पडली होती.दरम्यान बसमधील प्रवाशांना तसेच इतर नागरिकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.अखेर काही प्रवाशांनी शेतातून पर्यायी मार्ग काढत आपले गाव गाठले. या घटनेमुळे परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून झाडे हटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली.