मागील काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाई भासत आहे. त्यामुळे पंपावर रात्रंदिवस वाहनाच्या रांगा असल्याचे दिसते. रात्रीच्या वेळी सुद्धा पंपावर जिकडे डिझेल पेट्रोल उपलब्ध आहे, तिकडे वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.