नागपूर येथे पार पडलेल्या 69 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात बुलढाणा बॉम्ब शोधक व नाशक पथकातील जीमी नावाच्या श्वानाने आपल्या अफाट कौशल्याच्या जोरावर सुवर्णपदक पटकावले आहे .. संपूर्ण देशातून आलेल्या शेकडो श्वानांना मागे टाकून जिमीला मिळालेले यश हे केवळ बुलढाणा जिल्ह्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरली आहे..