बुलढाणा जिल्ह्यात रविवारी सकाळी अचानक हवामानात बदल होऊन खामगाव आणि शेगाव परिसरात मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस पडला. ४३ अंश तापमानानंतर या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.