बुलढाणा : रोहिणी , मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जून महिनाही कोरडा जातो की काय , असे मुख्यतः विदर्भातील शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र मागील 24 तासांमध्ये सलग पाऊस आणि त्यातच सहा इंचापेक्षा जास्त पाऊस झाल्याने संपूर्ण तयारी झाल्यामुळे बळीराजा सकाळीच आपल्या शेतात पोहोचला.. आपल्या परिवारातील सदस्यांनी काळया मातीची पूजा करत चांगलं पीक येऊ दे अशी मनोभावे इच्छा व्यक्त केलीय. शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे.. बुलढाण्यातील घाटाखालील खामगाव तालुक्यातील शिरजगाव देशमुख जवळच्या शेतातील शेतकरी विनायक टिकार यांनी आपल्या शेतात कापशी लागवड करण्यापूर्वी काळ्या आईची नारळ फोडून पूजा केली. त्यानंतर लागवडीला सुरुवात केली.