बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली येथील कूलस्वामिनी श्री रेणूका देवीच्या वासंतिक नवरात्रोत्सवाला आज पासून प्रारंभ झाला असून शहरात सर्व उत्सवाची लगबग सुरू झाली आहे.रेणुका देवी मंदिर परिसर सज्ज झाला असून यात्रा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी 'व्यापक तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे.या उत्सवाची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे. देवीच्या वाहनाला जी बैलजोडी जुंपली जाते, त्यांची आज शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. तर देवीला पातळ ही वाढवण्यात आले असून शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही परंपरा संस्थांनी सुरू केली आहे.