सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्ग्यावर रात्री लाखो भाविकांच्या उपस्थितीत संदल काढण्यात आला. होळीपासून सैलानी बाबांच्या यात्रेला उत्साहात सुरुवात करण्यात आली, एक महिना चालणाऱ्या यात्रेमध्ये विविध राज्यातील लाखो भाविक दाखल झालेले आहेत.