खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबतच्या तक्रारी वाढल्या आहे. चिखली तालुक्यात जवळपास 40 हेक्टर क्षेत्रावर बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या असून शेताचे पंचनामा सुरू आहेत. मात्र ज्या शेतकऱ्याच्या शेतातील बियाणे उगवले नाहीत, त्यांना आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. तर काहींनी दुबार पेरणी सुरू केली असून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.