बुलढाणा जिल्ह्यात यंदा सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली असून साडे पाच लाख हेक्टर वर सोयाबीन पीक आहे. सध्या सोयाबीन पिकाची वाढ होत असतानाच विविध प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अळ्या सोयाबीनच्या पानांवर ताव मारत असल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.