बुलढाणा : सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून तापमानाचा पारा चढत असताना माणसांबरोबरच पशू-पक्ष्यांनाही उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे… जंगल परिसरात नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटत असल्याने पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे… याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील कदमापूर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक अत्यंत स्तुत्य आणि समाजाला दिशा देणारा उपक्रम राबवला आहे…उपक्रमशील शिक्षक राजेश कोगदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी खामगाव ते बुलढाणा रोडवरील ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या झाडांवर पक्ष्यांसाठी मातीची पाणीपात्रे लावली… एवढेच नाही, तर या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांना मोफत पाण्याच्या बाटल्या देऊन त्या पाणीपात्रांमध्ये दररोज पाणी भरावे, असे आवाहनही केले.. या उपक्रमामुळे हा रस्ता पक्ष्यांसाठी ‘सुरक्षित पाणीकॉरिडॉर’ ठरणार आहे…