बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. परिणामी मानेगाव येथे नाल्या नसल्याने आणि नाल्यांची साफसफाई नसल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरत शिरले. यामुळे अनेक नागरिकांच्या घरातील साहित्य भिजल्याने नुकसान झाले आहे.