लोणार तालुक्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे सावरगाव तेली येथील नारळी नदीला पूर आला आहे. या नदीच्या पुलावरून पाणी वाहत असून शेतातून यशोदा चव्हाण ही महिला घरी परतत असताना नदी ओलांडत होती. या महिलेचा पाय घसरला आणि महिला नदीच्या पुरात वाहून जाऊ लागली. प्रसंगावधान राखत गावातील युवकांनी नदीमध्ये उडी मारली आणि त्या महिलेला वाचविले