मुकी जनावरं अबोल असतात. त्यांना आपल्या भावना बोलून व्यक्त करता येत नाहीत. मात्र, हीच मुकी जनावरं अनेकदा आपल्या अव्यक्त भावना कृतीतून दाखवत असतात. अशीच एक अत्यंत भावनिक घटना समोर आली आहे अकोला जिल्ह्यातील दापुरा गावातून अंकुश गावंडे यांच्या मालकीची एक गाय चोरीला गेली, चोरट्यांनी या गायीला फोरव्हीरमध्ये टाकून घटनास्थळावरून धूम ठोकली, मात्र तिथे असलेल्या एका बैलानं या गायीला वाचवण्यासाठी दूरवर या गाडीचा पाठलाग केल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व थरार सीसीटव्हीमध्ये कैद झाला आहे.