खेडशिवापूर ते कापूरहोळ दरम्यान बुलेटच्या मोडिफाईड सायलेन्सरमधून फटाक्यांसारखे कानठळ्या बसवणारे आवाज काढून, बुलेटस्वारांच्या टोळक्याचा हैदोस सुरू असून नागरिक हैराण झाले आहेत. महामार्ग लगत राहणारे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री साडेबारा पासून ते 4 पर्यंत सायलेन्सर मधून फटाक्यांसारखा आवाज काढणाऱ्या बेधुंद बुलेटस्वार टोलक्याचा हा उच्छाद सुरू होता.