सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग इथं चेअरमन केसरी बैलगाडी शर्यत पार पडली. या बैलगाडी शर्यतीमध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकमधील सुमारे 111 हून अधिक बैलगाडी चालकांनी सहभाग घेतला होता. म्हैसाळकर शिंदे कारखान्याच्या जवळ असणाऱ्या रेल्वे पट्टा या ठिकाणी बैलगाड्या शर्यतीचा थरार रंगला होता, ज्यामध्ये हरिपूरच्या बुलेट छब्या आणि फाकड्या बैलजोडीने पहिला क्रमांक मिळवत चेअरमन केसरी किताब पटकावला आहे.