जळगाव-संभाजीनगर रोडवर वाकोद जवळ पिंपळगाव फाटा या ठिकाणी एका गाडीचा टायर फुटल्याने तिला आग लागली आणि यात गाडी जळून खाक झाली आहे. गाडीने पेट घेतल्यानंतर त्यातील चालकाला काच फोडून बाहेर काढले परंतू गाडीत धुळ असल्यामुळे महिला दिसली नाही. चालकाला बाजूला नेल्या नंतर त्यांनी सांगितले गाडीत माझ्या सोबत महिला पण आहे. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. महिला गाडीत जळून मृत्युमुखी पडली आहे.