पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांची भात खाचरं भाजणीची लगबग सुरू झाली आहे. शेतात राब तयार करून चार ते पाच दिवस वाळवून कवळे करून शेत भाजलं जातंय. पालापाचोळा, वाळलेले शेण, वाळलेल्या फांदया, गवत असे तरवा पेरणीच्या जागेवर पसरवून राब तयार केला जातो. भात तरवे, वाफे भाजणी केल्याने जमीन पोषक होऊन भात तरव्यांची उगवण चांगली होते. शेतातील विषारी तण जळून जातात.