कोकणातील गणेशोत्सव आणि गौरी पूजनाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने कोकणातील प्रवाशांसाठी परभणी विभागांतर्गत एकूण 115 बसेस मुंबईकडे वळविल्या आहेत. 23 ऑगस्ट पासून 8 सप्टेंबरपर्यंत परभणी विभागाने परभणी, गंगाखेड आणि वसमत या तीन आगारातून बसेसस मुंबईकडे रवाना केल्या आहेत.