नाशिकच्या बागलाण तालुक्यात वटार येथे कोबी पिकांवर डावणी, करपा आणि सड रोगाने मोठं थैमान घातलं आहे. जिभाऊ खैरनार या शेतकऱ्याने दोन महिने जीव तोडून उभं केलेलं पीक रोगांमुळे उद्ध्वस्त झाल्यानं शेवटी रोटर फिरवून पीक उद्ध्वस्त केलं. रोग आणि किडी मुळे लागवडीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजारात भाव वाढतील असेही चिन्हे दिसत नाहीत आणि जास्त काळ ठेऊ ही शकत नसल्याने शेतकर्यांन शेवटी कोबी प्लॉटवर रोटर फिरवला