धुळे तालुक्यातील निमडाळे शिवारात बिबट्याचा वावर असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या भागात शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून निमडाळे ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती देऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा आणि कॅमेरा लावण्याची मागणी केली.