हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील नवी चिखली शिवारात कॅनॉलचा काही भाग तुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच कॅनॉलचा काही भाग तुटल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.