सांगलीच्या कृष्णा नदीत अखिल भारतीय कनोईंग आणि कायाकिंग स्पर्धांना आजपासून प्रारंभ झाला आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. 40 विद्यापीठांमधील 685 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तीन दिवस या स्पर्धा पार पडणार आहेत. सांगलीच्या सरकारी कृष्णा नदी घाट परिसरात या स्पर्धा पार पडत आहेत.