पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली येथील एका पेट्रोल पंपासमोर भरधाव कार उलटी होऊन महामार्गावर फरफटत गेल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.