रत्नागिरी- समुद्र किनारी हुल्लडबाजी करणे अंगलट आले आहे. दापोली तालुक्यातील आंजर्ले किनाऱ्यावर कार बुडाली आहे. गावातील काही मंडळींनी मौज मजेसाठी समुद्राच्या पाण्यात कार घातली. परंतू पौर्णिमेला समुद्राच्या पाण्याला नेहमीपेक्षा जास्त भरती असल्याने ही कार वाळूत रुतली, भरतीचे पाणी वाढल्याने अखेर गाडी बुडाली. समुद्र किनाऱ्यावर गाडी नेण्यास मज्जाव असताना नियमाची पायमल्ली होत आहे.