पुण्याच्या भोर तालुक्यातील भोलावडे गावात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताने एका चारचाकी गाडीची तोडफोड केली. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्ती गाडीची काच फोडून पसार झाला. गाडीची काच फुटल्यानं गाडी मालकाचं आर्थिक नुकसान झालं आहे. याबाबत गाडीमालक विष्णू नारायण काळे यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. भोर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.