पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान, विसर्जन मार्गावरील रस्त्यावर रांगोळ्यांच्या पायघड्या पडल्या. राष्ट्रीय कला अकादमीच्या 500 सदस्यांकडून विसर्जन मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या. रांगोळीच्या माध्यमातून खाद्यपदार्थात होणारी भेसळ या संदर्भात जनजागृती करण्यात आली.