जळगावच्या भुसावळ शहरातील मटन मार्केटच्या पाठीमागील परिसरात घरफोडी झाली. चोरट्यांनी गॅस कटच्या साह्याने कपाट कापून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिन्यांसह लाखोचा ऐवज लांबवला. दोन्ही खोल्यांचे कडी-कोंडे तुटलेल्या अवस्थेत आढळले. एका खोलीतील पेटी फोडली होती तर दुसऱ्या खोलीतील कपाटांचे कुलूप तोडले होते. विशेष म्हणजे एका कपाटाचे कुलूप गॅस कटरने कापण्यात आले होते. तसेच घरातील पलंग, बॅग, पिशव्या व तिजोरीतील साहित्य बाहेर फेकले होते. चोरट्यांनी सुमारे रोकडसह पाऊण ते एक किलो चांदीचे दागिने, फुलजोडी, चैन, पट्टया, जोडवे, पायातील बेडी, अंगठ्या तसेच तीन ते चार तोळे सोन्याचे दागिने, गळ्यातील चेन, चावलपोत, सातपत्ती मंगळसूत्र व मुख्य मंगळसूत्र असा लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला.