नाशिकच्या निफाड तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढल्याने पशुपालक शेतकऱ्यांची डोकेदुखीत वाढली आहे. पशुधनावर बिबट्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे देवगाव येथील पशुपालक शेतकरी प्रशांत कुलकर्णी यांनी गायींच्या सुरक्षेसाठी बँकेकडून कर्ज घेऊन बंदिस्त गोठा उभारला आहे. बंदिस्त गोठ्यात गायींना उष्णतेचा त्रास होऊ नये आणि हवा खेळती राहावी यासाठी त्यांनी पंख्यांची व्यवस्था केली आहे.