बीड शहरातील अंकुश नगर भागात 6 जानेवारी रोजी पाईप लाईनचे काम करणाऱ्या हर्षद उर्फ दादा शिंदे याची गोळ्या घालून आणि धारदार शस्त्राने वार करून हत्या झाली होती.या गोळीबाराचे आणि त्यानंतर धारदार शस्त्र घेऊन पाठलाग करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.आरोपी विशाल सूर्यवंशी हा एका दुचाकीवरून काम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचतो यानंतर कमरेला लावलेली पिस्तूल काढून गोळ्या घालताना दिसत आहे.