पालघर जिल्ह्यात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समिती बैठकीत पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे सामाजिक वातावरण बिघडू शकते, त्यामुळे नागरिकांनी सजग राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.गोवंश हत्या बंदीच्या अंमलबजावणीबाबत सर्वांचे एकमत असल्याचे सांगत गोवंशाच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रणासाठी जिल्ह्यात १६ ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आल्याची माहिती दिली.