जालन्यात पहिल्यांदाच श्री संत मुक्ताईंचा रिंगण सोहळा पार पडणार आहे. 5 जुलैला जालन्यातील जे ई एस महाविद्यालयाच्या मैदानावर श्री संत मुक्ताईंचा रिंगण सोहळा होणार आहे.या रिंगण सोहळ्याची जालनेकरांना उत्सुकता असून रिंगण सोहळ्यासाठी प्रशासनाकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.