शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या 148 वा प्रगट दिन उत्सव काल उत्साहात साजरा करण्यात आला.. या प्रगट दीन उत्सवात तब्बल 1029 दिंड्यांनी सहभाग घेतला होता तर लाखोच्या संख्येने भाविक या उत्सवात सहभागी झाले होते.. दोन लाखापेक्षा जास्त भक्तांना महाप्रसादाची वितरण सुद्धा करण्यात आले.. आज सकाळी हभप रवींद्र बुवा हरणे, श्री शेत्र मुक्ताईनगर यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर या प्रगट दिन उत्सवाची सांगता झाली.. आठवड्यापासून श्रीच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले , यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण पहायला मिळाले.