केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नारायणगाव येथील राजे ग्रुप महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने नारायणगाव येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत फटाके फोडून तसेच मेलोडी चॉकलेटचे वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला.