केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम (CGHS) दरांमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. यामुळे सुमारे 2000 हून अधिक वैद्यकीय प्रक्रियांचे दर १३ ऑक्टोबर २०२५ पासून बदलतील. रुग्णालयाची मान्यता, शहराची श्रेणी आणि वॉर्ड प्रकारावर आधारित हे नवीन दर निश्चित केले आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.