केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत वंदे मातरम् संदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, सरकारी कार्यक्रम, शाळा आणि इतर औपचारिक समारंभांमध्ये संपूर्ण वंदे मातरम् (सहा कडवी, ३ मिनिटे १० सेकंद) गायन किंवा वादन अनिवार्य असणार आहे. हे गीत राष्ट्रगीतापूर्वी वाजवले जाईल आणि सन्मानार्थ सर्वांना उभे राहावे लागेल.