मध्य रेल्वेवर १० तासांच्या मेगा ब्लॉकमुळे कोपर आणि ठाकुर्ली स्थानकात लोकल सेवा विस्कळीत झाली असून, पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवासी जीव धोक्यात घालून रेल्वे ट्रॅकवरून प्रवास करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.