मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे होणारे हाल आणि चिडचिड आता थांबणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने लांबपल्ल्यांच्या गाड्यांच्या नियोजनाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे लोकल वेळेवर येतील आणि प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल. महिलांसाठी विशेष लोकल सेवाही सुरू होऊ शकते.