शेलू आणि नेरळ रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन मार्गावर डेक्कन एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेवरील डाऊन दिशेकडील रेल्वे वाहतूक ठप्प झालीये. उद्यान एक्सप्रेससह कर्जत लोकल वांगणी रेल्वे स्थानकात खोळंबल्या आहेत. तर डाऊन मार्गावरील कर्जत खोपोली गाड्या बदलापूर रेल्वे स्थानकातूनच सीएसएमटी स्थानकाकडे पाठवण्यात येत आहेत.