मध्य रेल्वेने उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल जाहीर केले आहेत. मुंबईसह लातूर, नागपूर आणि अमरावती येथील प्रवाशांना याचा परिणाम होणार आहे. १३ आणि १४ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने हे बदल लागू होतील. प्रवासाला निघण्यापूर्वी नवे वेळापत्रक तपासण्याचे आवाहन आहे.