चाकण नगरपरिषदेच्या कारभारातील निष्काळजीपणा पुन्हा समोर आला आहे. विजयी उमेदवारांना दिलेल्या प्रमाणपत्रांवर चुकून २०१५ चा शिक्का नमूद केल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही चूक दुरुस्त केली असली तरी, नगरपरिषदेचा भोंगळ कारभार ठळकपणे उघड झाला आहे.