आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथे बिबट्या, वाघ व हत्ती यासारख्या वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये देऊळगाव व इंजेवारी येथे 3 महिला वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये ठार झाल्या आहेत, त्यामुळे आता नागरिक अधिक आक्रमक झाले आहेत.