जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर डेरेदार वृक्षांची कत्तल सुरू असल्याचे समोर येत आहे. पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे वृक्ष अवैध पद्धतीने तोडले जात असून हरित संपत्ती झपाट्याने कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकाराकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सुरू असलेल्या या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत वनविभागाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.