चाळीसगाव घाट रोडवरील पुलाचा भराव वाहून गेल्याने पूल धोकादायक बनला आहे. यामुळे शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार आणि पादचारी यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुरुस्तीसाठी कोणतीही कार्यवाही केली नाही. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.